जळगाव राजमुद्रा दर्पण । भुसावळ मधील मिरगव्हान गटातील राष्ट्रीय महामार्गावर वापरण्यासाठी लागणारे गौणखनिज उत्खननासाठी जमीन मालकाशी आयुष पोक्रोन कंपनीने करार केला होता .मात्र कंपनीने प्रमाणापेक्षा अधिक गौणखनिज उत्खनन केल्यामुळे तहसीलदारांनी कंपनीला सुमारे 75 लाख रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. यात असे नमूद करण्यात आहे आले की , ‘पुढील तीन दिवसात ही दंडाची रक्कम न भरल्यास ती कंपनीकडून वसूल करण्यात येईल ‘ या प्रकरणात केदारनाथ सानप माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी तक्रार केली आहे.
तरसोद ते चिखली या राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या कामासाठी आयुष्य प्राकोन या कंपनीने गौणखनिज उत्खननासाठी मिरगव्हान येथील गट नं 85 च्या मालक कांताबाई बन्सीलाल बियाणी यांच्याशी करार केला होता .यात काही अडचण आल्याने या खदानीसंदर्भात उपअधीक्षक भूमी अभिलेख भुसावळ यांनी अहवाल सादर केला होता , या तफावतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागण्यात आले होते , तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आयुष पोक्रोन कंपनीकडून 75 लाखांचा दंड वसूल करण्याची नोटिस देन्यात आली आहे .