(यावल राजमुद्रा वृत्तसेवा) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रोजी घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत शिरोळे (धनगर) वय ५५ असे मयत शेत्माजुराचे नाव आहे. भागवत शिरोळे यांनी १३ जून रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास खालचे गावालगत शिवारातील शालिक रामचंद्र फिरके यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले. पत्नी असल्याचे सांगण्यात आले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..