(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते आज मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि राज ठाकरे यांची येत्या महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली असल्याचे सांगितले. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लसीकरणाचा उपक्रम राबवणाऱ्यांचे स्वागत करतो. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महानगर पालिका आणि इतर निवडणुकांची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोनाकाळ संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडतील” बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
राज ठाकरे यांचं चिंतन-मनन नेहमी सुरु असेते. महाराष्ट्रप्रती, लोकांप्रती समस्यांचं चिंतन मनन सुरु आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट २०१४ ला अर्पण केली. तब्बल ८ वर्ष अभ्यास करुन त्यांनी महाराष्ट्राप्रती व्हिजन मांडलं आहे. महाराष्ट्राप्रती कोणतीही तडजोड नाही. पक्ष स्थापन केला त्यावेळी त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण केलं. येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे थांबवं लागल असून ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र कोव्हिड काळानंतर त्यांचा झंझावाती दौरा सुरु होईल, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.