आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये महिलांना 6000 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. शेतकर्यांव्यतिरिक्त महिलांनाही सरकार 6000 रुपयांची मदत करते. पीएम मातृत्व वंदना योजना असे या योजनेचे नाव आहे.या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील महिलांना 6000 रुपये देते. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया-
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत गरोदर आणि प्रथमच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू झाली. ती प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेचा उद्देश आई आणि बाळ दोघांची चांगली काळजी घेणे हा आहे, त्यासाठी सरकार त्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. सरकार हे पैसे तीन टप्प्यात देते.
पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. सोबतच, बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे 1000 रुपये रुग्णालयाला देते.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana ला भेट देऊ शकता.