दरवर्षप्रमाणे या वर्षी ही पंकज नाले यांनी आपला जन्मदिन अगदी साद्या सोप्या पद्धतीने साजरा केला,यांच्या जन्मदिनी जय दुर्गा मेहरुन शाळेत होतकरू व गरजू मुलांना वह्या तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके शहराच्या प्रथम नागरिक महापौर व जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका सौ,जयश्री ताई महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या , तेव्हा त्या प्रसंगी ताई बोलत होत्या की आपण समाजाचे देण लागतो आणि प्रत्येकाने पंकज दादा सारख्याच आदर्श जर घेतला तर निश्चित आपण अजून पुढं जाऊ शकतो, पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे नाना पाटील सर यांनी पंकज दादा विषयी भावना व्यक्त करतांना पंकज दादा म्हणजे मानसे जोडणारे व्यक्तीमत्व ते कसेही असो पण त्यांना साखळीत जोडणे फार कठीण असते तेच काम आमचे पंकज दादा करतात,त्या प्रसंगी जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले,समाजसेविका निशा पवार ,शाह नवाज खान, पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे नाना पाटील सर , सुरेंद्र सिंग पाटील,नारीशक्ती अध्यक्षा मनीषा पाटील,सचिव हर्षाली पाटील,पंकज मोरे ,अड हेमंत दाभाडे,पोलीस सुनील परदेसी,सचिन सैदाने,ललित धांडे,राकेश भोई , जितू जावळे दिशा स्पर्धा परीक्षेचे वासुदेव पाटील,यांनीही सहकार्य लाभले,शाळेचे चिमण कर,सर, बद्गुजर सर, यांचे मार्गदर्शन लाभले तसेच खोटे नगर भागात अन्नदान करण्यात आले,