जळगाव शहरातील नागरिकांना चांगले आरोग्य सेवा मिळावी म्हणून लवकरच जळगाव शहरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 24 आरोग्य रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
प्रलंबित असणारे 42 कोटीची कोटी रुपयांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांची गती वाढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव शहरासाठी 24 अर्बन हेल्थ सेंटर & वेलनेस सेंटर मंजूर झालेले असून त्यासाठी मनुष्यबळ तसेच मेडिसिन व इतर साहित्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. असे सांगून आ. राजूमामा भोळे म्हणाले या अर्बन हेल्थ & वेलनेस सेंटर साठी लागणारी जागा ही महापालिकेच्या मालकीची असलेली इमारत मिळणार आहे. त्यासाठी शहर अभियंता यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. तसेच शहरातील सहा जागांबाबत सकारात्मक अहवाल प्राप्त झालेला आहे. उर्वरित जागांसाठी पुन्हा शहर अभियंता यांच्याकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत आ. राजूमामा भोळे यांनी याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा केली शहराचा कायापालट होण्यासाठी आणि गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमदारांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
सोबत शासकीय पत्र जोडले आहे.
.प्रती, मा.संपादक यांच्या सेवेशी, आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात उद्याच्या अंकात वरील बातमी प्रसिद्ध करून उपकृत करावे हि विनंती_
धन्यवाद…. कळावे.
आपला स्नेहांकित
आ.राजूमामा भोळे जनसंपर्क कार्यालय, जळगाव.