भारतीय रेल्वेचे जनक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री संत नरहरी सोनार युवा फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे आयोजित करण्यात आली, दरम्यान नाना शंकरशेठ यांचे मुंबई व महाराष्ट्रासाठीचे योगदान महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावे असा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज, नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान नाना शंकरशेठ यांचा पुढील जयंती उत्सव धुळे जिल्ह्यात साजरी होईल अशी घोषणा यावेळी श्री संत नरहरी युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.शामकांतजी दाभाडे यांनी केली. यावेळी धुळे जिल्ह्याच्या पदाधिकारी मंडळाने धुळे जिल्ह्यात संघटने अंतर्गत होत असलेल्या सेवाभावी कामांबद्दल माहिती दिली व लोकहिताचे समाजहिताचे विधायक कार्य असेच अविरत सुरू राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुखस्थानी श्री संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.शामकांतजी दाभाडे साहेब, कोअर कमिटी प्रदेशाध्यक्ष सतिषजी हिंगोलीकर नागपूर, युवक प्रदेशाध्यक्ष राकेशजी दुसाने नाशिक, सुवर्णकार सराफ व्यापारी समिती प्रदेशाध्यक्ष सचिनजी घोडके डोंबिवली, महिला प्रदेशाध्यक्षा मीनाताई सोनार नाशिक, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे यवतमाळ, नाना शंकरशेठ प्रथम पुरस्काराचे मानकरी कृषितज्ज्ञ प्रा. कृष्णा शहाणे नाशिक, महाराष्ट्र राज्य निरीक्षक जयेश देवरे नाशिक, प्रदेश सचिव विनोद भामरे जळगाव, कार्याध्यक्ष निलेश भामरे जळगाव, प्रदेश जनसंपर्क अधिकारी मयूर अहिरराव धुळे, मिडिया प्रमुख मनोज बिरारी शहादा तसेच धुळे जिल्हयातून धुळे महानगर अध्यक्ष संकेतबाबा सोनार, धुळे ग्रामीण अध्यक्ष संदीप विसपुते, धुळे महानगर सचिव सिद्धेश नाशिककर, तालुकाध्यक्ष सुभाष भालेराव, महानगर महिला अध्यक्षा सोनालीताई विसपुते, ग्रामीण महिला अध्यक्षा अनुराधाताई अहिरराव, ममताताई भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मा.जयेशजी देवरे, मा.राहुल सोनार, मा. सागर सोनार यांनी सहकार्य केले.