जामनेर(प्रतिनिधी) राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा :- तालुक्यातील डोहरी तांडा येथील आरोपीने झोपलेल्या सख्या बहीणीचा विनयभंगचा गुन्हा केल्याने त्यास न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.आरोपी उदयसिंग धिरसिंग राठोड याने दिनांक २८ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी आपल्या आईसोबत झोपलेली असताना आरोपी उदयसिंग याने दारूच्या नशेत सख्ख्या बहीणीचा विनयभंग केला.फिर्यादीच्या आईने आरोपीला विरोध करत त्याच्या तावडीतून मुलीला सोडविले.त्यावेळी आरोपीने त्याच्या मनासारखे न केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.या खटल्यात ६ साक्षीदार तपासण्यात आले.खटला न्यायाधीश दि.न.चामले यांच्या न्यायालयात चालला.सदर खटल्याचा निकाल शिघ्रगतीने २ महिने १२ दिवसात लागला.त्यामुळे वकील वर्गात व पक्षकारा यांच्यामध्ये याची दिवसभर चर्चा होती.सरकार पक्षातर्फे अँड.क्रुतीका भट यांनी काम पाहिले.त्यांना पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली.तपास पो.हे.कॉ.साहिल तडवी यांनी केला.