राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्त्रोत म्हणून ओळखल्या जाते. मात्र यावर्षीच्या प्रवेश शुल्कात विद्यापीठाने अचानकपणे मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. सातत्याने पडत असलेला ओला दुष्काळ व इतर नैसर्गिक समस्यांमुळे सर्वसाधारण कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची झालेली आहे आणि अशा स्थितीत विद्यापीठाने अचानकपणे चौपटीने प्रत्येक विभागाची शैक्षणिक शुल्क वाढवून विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. शैक्षणिक शुल्क वाढीच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कुलगुरूंना भेटून निवेदन दिले. शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्याला परवडेल अशा स्वरूपाची ठेवावी अन्यथा विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करेल असे निवेदनात सांगण्यात आले. यावेळी जळगाव विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, विभाग संघटन मंत्री शुभम स्वामी, जळगाव जिल्हा संयोजक मयूर माळी, नितेश चौधरी, चैतन्य बोरसे, शिवा ठाकूर ,आदित्य चौधरी, मोहित कोळी, शिवम पाटील, रविंद्र पवार यावेळी उपस्थित होते.