जळगाव राजमुद्रा दर्पण – जळगाव मराठी प्रतिष्ठान तर्फे मेहरून तलावाच्या काठावर दि १४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचे विषेश आकर्षक तिरंगा भजी..
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे या करीता तीन रंगाची भजी बनविण्यात येणार आहे. त्या सोबतच कांदा भजी,बटाटा भजी,मिरची भजी,गिलका भजी,पालक भजी, असे विविध प्रकारच्या भज्यांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.
देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम..
भजी महोत्सवात संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत
एक शाम आझादी के नाम देशभक्ती वर आधारित हिंदी मराठी गीत गायन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी प्रतिष्ठान आयोजित भजी महोत्सवाचा खवय्यांनी आनंद घ्यावा अशी विनंती मराठी
प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर,विश्वस्त सौ संध्या वाणी,सौ अनुराधा रावेरकर, सौ निलोफर देशपांडे, डॉ.सविता नंदनवार यांनी केली आहे.