जामनेर(प्रतिनिधी):- ग्रेट मराठी न्युजचे संपादक मिलिंद लोखंडे यांचा जेष्ठ चिरंजीव दिवंगत स्वप्नील याच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने आदिवासी बहुल वस्तीमधील जि.प. प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना लोखंडे परिवाराच्या वतीने भोजन दान करण्यात आले, मागील वर्षी अल्पशा आजाराने स्वप्नीलचे दुःखद निधन झाले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या तसेच दिवंगत स्वप्नीलच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वप्नील याच्या आई वडिलांनी व परिवारातील सदस्यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच यावेळी दिवंगत स्वप्नील याच्या आठवणींना उजाळा देत भारतीय बौध्द महासभेचे जळगाव जिल्हा संस्कार विभाग प्रमुख आयु.सुशीलकुमार हिवाळे, भा.बौ.महासभेचे जामनेर तालुका संस्कार सचिव आयु.माणीक लोखंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, तसेच ज्योत्स्ना विसपुते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी लोखंडे परिवाराला अश्रू अनावर झाले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन भारतीय बौद्ध महासभेचे जामनेर तालुका अध्यक्ष वसंत लोखंडे यांनी केले. नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेवक जितेंद्र पाटील, दीपक तायडे,नगरसेवक कैलास नरवाडे, आश्रमशाळा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गोविंदा गुंजाळ,शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नाईक तसेच शाळेतील इतर शिक्षक व मित्र परिवार उपस्थित होते.