राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा रावेर(प्रतिनिधी):- रावेर पंचायत समिती मधिल बहुचर्चीत वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणाची उपलोक आयुक्त मुंबई यांनी दखल घेतली असुन या प्रकरण संदर्भातील त्यांनी विभागीय आयुक्त नासिक यांना चौकशीचा अहवाल मागितला आहे.
येथील पंचायत समिती मधिल बहुचर्चीत शौचालय योजनेचा भ्रष्ट्राचार प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणाची दखल मुंबई उपलोक आयुक्त सजंय भाटिया यांनी दखल घेतली असुन त्यांनी या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना चौकशी करून अहवाल मागविला आहे. आता पर्यंत या प्रकरणा संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असुन सहायक गट विकास अधिकारी,सेवा निवृत्त विस्तार अधिकारीसह अठरा जण तुरुंगात आहे. अद्याप अनेक जण पोलिस प्रशासनाच्या रडारवर आहे.या गुन्ह्याचे सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक तपास अधिकारी आहे.