राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा । करदात्यांसाठी मोठे अपडेट. केंद्र सरकारने नियमांमध्ये केलेल्या बदलामुळे आयकरदात्यांना यापुढे अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच आता करदात्यांना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत काय म्हटले आहे ? :-
अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, “1 ऑक्टोबर 2022 पासून, जे लोक कर भरतील किंवा भरणार आहेत, ते सर्व लोक अटल पेन्शन योजनेचा भाग बनू शकणार नाहीत. म्हणजेच, असे लोक कर भरण्यास पात्र आहेत, ते यापुढे त्याचा भाग बनू शकणार नाहीत. हा आदेश 10 ऑगस्ट रोजी अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. नवीन दुरुस्तीनुसार, जर एखादा करदाता 1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा भाग झाला तर त्याचे खाते बंद केले जाईल आणि त्याचे संपूर्ण पैसे परत केले जातील.
अटल पेन्शन योजना काय आहे ? :-
अटल पेन्शन योजनेंतर्गत, 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सामील होऊ शकतो. या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शनची तरतूद आहे. पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते.