मुंबई राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – ज्येष्ठ शेअर गुंतवणूकदार आणि अब्जाधीश उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. झुनझुनवाला यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. झुनझुनवाला यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आकाशा एअरलाईन्स सुरू केली. झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून शेअर मार्केट मधील सर्व गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.
काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडली असून, प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे.