जळगाव वृत्तसेवा | देशाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गाठ बांधून भविष्यातील मार्गक्रमण करावे यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल यासाठी कठोर परिश्रम व विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. आई-वडिलांच्या उद्धारासाठी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्टा करून संघर्ष करावा तेव्हाच शिक्षणात यश अटळ असते असे देखील महापौर महाजन यावेळी म्हणाले आहे. शहरातील पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये एकूण 550 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देण्यात आला आहे शैक्षणिक साहित्यावर जीएसटी तसेच इतर कार्यालयाने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेताना आर्थिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जैन उद्योग समूहाच्या सहकार्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच पाल्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक मुकुंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पोलीस निरीक्षक परदेशी,सामाजिक कार्यकर्ते मंगलाताई देवरे आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश माळी, तुषार भामरे, चेतन वाणी,प्रभाकर महाले,हर्षल चौधरी, गणेश देवरे,श्रीकांत चौधरी, जय महाले,श्रीकांत चौधरी, शुभम देवरे,सागर जोशी आदींनी परिश्रम घेतले.