मुंबई राजमुद्रा दर्पण – मुंबईत शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी साजरी करताना २४ गोविंदा जखमी झाले. यापैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर १९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
जन्माष्टमीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाचे आयोजन केले जाते. खेळादरम्यान स्पर्धक पडून जखमी होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत दहीहंडी खेळात सहभागी २४ सदस्य दुपारी ३ वाजेपर्यंत जखमी झाले आहेत. त्यापैकी १९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पाच गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी नऊ जणांवर केईएम रुग्णालयात, पाच जणांवर नायर रुग्णालयात आणि चार जणांवर पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नुकताच सरकारने साहसी खेळाचा दर्जा दिला :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली की त्यांच्या सरकारने दहीहंडी या लोकप्रिय सणाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आदेशात सर्व शासकीय, महामंडळ आणि जिल्हा परिषद रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना या कार्यक्रमांमध्ये जखमी झालेल्या सहभागींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“आम्ही जून मध्येच जोरदार दहीहंडी फोडली होती,” शिंदेंचा ठाकरेंवर टोला