राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निकाल दि. 17/08/2022 रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात आला होता.त्यांवये BSC तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आढळून आल्यात.त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आले. त्यांनी त्वरित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली.प्रसंगी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करीत आपण लवकरात लवकर नक्कीच यातून मार्ग काढू अशी ग्वाही देखील दिली.या संदर्भात तात्काळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षा संचालकांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करीत लवकरात लवकर त्रुटी दूर करून सुधारित निकाल जाहीर करीत विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली. विद्यापीठातर्फे लागलीच २४ तासांत अभाविप व विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत सुधारित निकाल जाहीर करण्यात आला .प्रसंगी अभाविप जळगांव विभाग संयोजक कल्पेश सोनवणे,जळगांव जिल्हा संयोजक मयूर माळी,जळगांव महानगर मंत्री रितेश महाजन, भूमिका कानडे, नितेश चौधरी,चैतन्य बोरसे,गजानन पाटील,विशाखा पाटील, मंगेश ढगे आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.