राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – सरकारी तेल कंपन्यांनी काल (21 ऑगस्ट) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज 3 महिने उलटले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. केंद्र सरकारने शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घट :-
सध्या जगात मंदीचे सावट आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होत आहे. अमेरिकन बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $ 90 च्या जवळपास बंद झाला आहे. एकीकडे कच्चे तेल स्वस्त होत असताना भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते, असे मानले जात आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेल चे दर :-
– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर