पुणे राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – मांईड शिफ्ट मेंटाॅरीग (एम.एस.एम.)चे संस्थापक मानसशास्त्राचे अभ्यासक आणि एमआयटी वर्ल्ड पिस विश्वविद्यालय पुणे,फॅकल्टी आँफ पिस म्हणून कार्यरत असणारे आशिष पाटील यांच्या ‘ब्रेनगीता’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यामध्ये उत्साहात झाले. श्रीमद्भागवत गीता जीवनाचं रहस्य उलगडून सांगते आणि या रहस्याला विज्ञानाची जोड ‘ब्रेनगीता’ पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे.
आशिष पाटील यांच्या ‘ब्रेनगीता’ पुस्तकाच्या प्रयोगाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आशिष पाटील यांच्या आई-वडिलांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
आशिष पाटील यांनी ‘ब्रेनगीता’ पुस्तकाच्या माध्यमातून भागवतगीते विषयी असलेली प्रतिमा वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे नवरूपाने प्रकाशात आणलेली आहे. हे पुस्तक मानवाच्या जीवनाला दिशा देणारे ठरेल असा सूर ‘ब्रेनगीता’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये निघाला.
पुण्यात ‘ब्रेनगीता’ या पुस्तकाचे प्रकाशन आशिष पाटील यांच्या आई शैला पाटील, वडील सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी रिया व मुलगा धेयश, डॉ. अमित चौधरी, डॉ. साईदीप रथनम, चंद्रकांत पटेल, सुबोध कोरडे, जितेंद्र राठोड, डॉ अतुल पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.साईदीप रथनम( सीईओ, ईडो जपान स्टडी सेंटर आय.आय.एम, बैगलेरू)म्हणाले, ‘ब्रेनगीता’ हे पुस्तक जीवनाचा मार्ग दाखवणारे आहे.या पुस्तकातले बारकावे पाहताना मला लेखकाच्या आत मधला विश्लेषण करणारा विलक्षण माणूस प्रचंड आवडला. लेखकाला लढायला आवडतं. लेखकाला प्रत्येक चांगलं काम कृतीमध्ये उतरायला आवडते. हे पुस्तक तरुणाईची मानसिकता बदलणार पुस्तक आहे. हे पुस्तक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अनेक बाबींचा मेळ बसणारं आहे जीवनाचा प्रवास खडतर आहे तो सोपा करण्यासाठी या पुस्तकांमध्ये सांगितलेले मूल्य खूपच महत्त्वाचे आहेत. तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान या विषयीची जबरदस्त सांगड बसवण्याचे काम ‘ब्रेनगीता’ च्या माध्यमातून झाले आहे. ‘ब्रेन गीता’ हे नव्याने शिकणाऱ्या, मानवी मूल्यची जोपासना करणाऱ्या त्या प्रत्येकासाठी आवश्यक असा ग्रंथ आहे. अंतर्मनातील संकल्पना स्पष्टपणे मांडायच्या असतील, त्याला माणुसकीच्या सावलीने जोडायचे असतील तर या पुस्तकाला अभ्यासावे लागेल. असे मत डॉ. अमित चौधरी, (एमडी व पिचडी न्यूरोसायन्स)यावेळी व्यक्त केले. लेखकाला प्रत्येक चांगलं काम कृतीमध्ये उतरायला आवडते. हे पुस्तक तरुणाईची मानसिकता बदलणार पुस्तक आहे. हे पुस्तक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अनेक बाबींचा मेळ बसणारं आहे.
डॉ. अतुल पाटील(डायरेक्टर स्कूल ऑफ होलिस्टिकडेव्हलपमेंट, एमआयटी-एडिटी विश्वविद्यालय) म्हणाले,साध्या विषयावर पुस्तक लिहिणं तसं आव्हानाचं काम असते. आशिष पाटील यांनी ‘ब्रेन गीता’च्या माध्यमातून एक वेगळा ग्रंथ आपल्या समाजाला दिला आहे. हे पुस्तक मनोरंजनाचे पुस्तक नाहीये ते बुद्धीच्या कक्षा रुंदावणारं पुस्तक आहे.
सुबोध कोरडे म्हणाले, जीवन नावाच्या या आकर्षक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला आत्म-जागरूकता हवी आहे. ‘ब्रेनगीता’ या पुस्तकात भगवद्गीतेतील अध्यात्मिक ज्ञानाला आधुनिक मेंदुशास्त्र विज्ञान व सकारात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासाशी जोडल आहेत. माझा विश्वास आहे की ‘ब्रेनगीता’ आत्म-जागरूकतेच्या प्रवासात आणि अर्थपुर्ण जिवन जगण्यासाठी एक खरा संदर्भ बनू शकते.
मी कोण आहे? माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे? हे जाणून घेतल्यावरच यशस्वी होण्यासाठी अंतर्दृष्टी विकसीत होते व माणसाला दूरदृष्टी निर्माण होते आणि त्यातुनच प्रत्येक जण अर्थपूर्ण जिवन जगुन आपली महानता सिद्ध करू शकतो. या अनुषंगाने ब्रेनगीता आयुष्याची खरी सारथी ठरेल असे विचार लेखक आशिष पाटील यांनी मानले. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आशिष पाटील यांच्या ‘ब्रेनगीता’ च्या माध्यमातून मिळतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आशिष पाटील यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सिद्धी देशमुख यांनी केले तर मा. श्री सदानंद सवानल यांनी आभार मानले.