(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव शहरासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बी एच आर प्रकरणी जळगावच्या प्रथीयश असलेल्या भागवत गणपत भंगाळे यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते दरम्यान बी एच आर पतसंस्थे कडून घेतलेले संपूर्ण कर्ज परतफेड करण्यात आले असल्याची माहिती सागर भागवत भंगाळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
सागर भंगाळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बी एच आर प्रकरणी झालेल्या कारवाईत माझे वडील भागवत गणपत भंगाळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे तसेच बी एच आर पतसंस्थेतून त्यांनी पंचवीस लाखाचे कर्ज घेतले होते जे संपूर्ण कर्ज नियमानुसार सन २०१८ मध्ये भरण्यात आले असून तसा निरंक नाहरकत दाखला पतसंस्थेने दिला आहे, कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेवरील बोजा सुद्धा पतसंस्थेने हटविला आहे असेही सागर भंगाळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तसेच बी एच आर प्रकरणात भागवत भंगाळे यांना अधिक चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे हलविले आहे या घोटाळ्यात जिल्ह्यातील एका बड्या आमदारावर देखील कारवाई होणार असल्याचे समजते. यात आणखी कोण कोण मोठे बडे आसामी अडकले आहेत याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.