जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रावर प्रभाव पाडणारा तालुका म्हणून चाळीसगाव तालुका ओळखला जातो. गिरणा – मन्याड – तितूर नदीचे सुपीक खोरे, सातमाळा डोंगररांग व गौताळा अभयारण्याच्या कुशीत वसलेला, विविधता जोपासणारा चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अडीच वर्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतःला झोकून दिले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत विजय संपदन केला. दुर्दैवाने राज्यातील भारतीय जनता पक्षाची सत्ता ठाकरेंच्या दगाबाजीमुळे गेली आणि शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी अश्या तीन विरोधी पक्षांचे सरकार सत्तेत येऊन भाजपाला विरोधात बसावे लागले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री लोकनेते गिरीषभाऊ महाजन यांच्या विचारांनी प्रेरित असलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी गेली अडीच वर्ष विरोधी पक्षातील आमदार असूनही चाळीसगाव मतदारसंघातील जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. “पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाणा… सब समाज को साथ लिये आगे है बढते जाणा” हा भारतीय जनता पक्षाचा विचार घेऊन त्यांनी गेली अडीच वर्ष विकासकामांसोबतच जनतेचा विश्वास जिंकण्यात यश मिळविले आहे.
मात्र आता राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्वाला महत्व देणारे व विकासाला चालना देणारे भाजपा शिवसेना युती सरकार विराजमान झाले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे वजनदार नेते ना.गिरीषभाऊ महाजन व ना.गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरु झाला आहे असेच म्हणावे लागले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना विरोधातील लढाई, वा असो महापूर…
आमदार मंगेश रमेश चव्हाणः निडर आणि लढवय्ये नेतृत्व !
‘दुस-यांसाठी काही करायचं असतं…’ हा संस्कार चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या बालमनावर कोरला गेलाय. वडिल रमेशनाना व आई कमलबाई यांनी हे बाळकडूच त्यांना पाजले. हिंगोणे खुर्द ते महाराष्ट्राची विधानसभा हा त्यांचा प्रवासच रोमहर्षक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि युवकांचे संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर लौकीक मिळवला आहे. कोरोना काळात सर्व थांबलं असतांना ‘सदैव धावणारा आमदार’ अशी ओळख त्यांनी निर्माण केली. चाळीसगावच्या मुरब्बी राजकारणात त्यांनी गत दोन वर्षात विकास आणि प्रगतीचे पर्व रुजवले आहे. सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन ‘झगडा’ करण्याची त्यांची नेहमी तयारी असते. वयाच्या ३६ व्या वर्षी विधानसभेत चाळीसगावचा आवाज बुलंद करणारे नेतृत्व. असे वलय त्यांच्या नावाभोवती चकाकते आहे.
‘ कोरोना महामारीत सर्व कडीकुलूप बंद असतांना मंगेशदादांनी गरजूंसाठी अन्नसेवेची चूल पेटवली. ही अन्नपूर्णा सलग ६२ दिवस लाखों मुखांपर्यंत पोहचली. त्यांच्या संघर्षगाथेत ‘कोरोनायोद्धा’ हे पान जोडले गेले.
शेतक-यांच्या प्रश्नांवर त्यांचे लढवय्ये मन पेटून उठते. कोरोनातील सार्वजनिक टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यातच कशाचीही तमा न बाळगता त्यांनी कापूस व भरडधान्य खरेदी करण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला. कोरोनाकाळात महाराष्ट्राच्या पटलावर झालेले हे पहिलेच आंदोलन.
तालुक्यात गुटखाविरोधी मोहिम उघडत स्वतः जीव धोक्यात घालून रात्रभर पाठलाग करून ६५ लाखांचा गुटखा पकडून दिला व शेतकरी संघातील भरडधान्य खरेदीतील घोळ उघड करत शेतकी संघावर शासनाकडून कारवाई केली तसेच बोगस ज्वारी – बोगस खते यांचे रॅकेटच्या विरोधात वज्रमुठ आवळली. कोणतेही आंदोलन किंवा प्रश्न आर्ध्यावर न सोडता त्याच्या मुळापर्यंत जाऊन यशाचे तोरण बांधण्याची नैतिकता त्यांच्या ठायी आहे.
शेतक-यांच्या वीज तोडणी विरोधातही ते आक्रमक झाले. या आंदोलनात त्यांना १२ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास भोगून आल्यानंतर दुस-याच दिवशी राज्यातील सरकारचे तेरावे घालण्याचे धाडसही त्यांनी दाखवले.
रावळगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाला वठणीवर आणून शेकडो ऊस उत्पादकांच्या घामाचा पैसा मिळवून दिला.
तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर पावलांना उसंत घेऊ दिली नाही. पशुवैद्यकीय पदवीधारकांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर मांडूनच सोडविला. राज्यात सर्वत्र आंदोलनकर्ते शेतकरीपुत्र आमदार असा त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे.
सत्तेच्या वर्तूळात नसतांनाही लोकसंग्रह आणि कार्यकर्त्यांचे भरीव जाळे त्यांनी निर्माण केले. ‘दिलदार मित्र’ असा वेगळा पैलूही त्यांच्यात आहे. रणरणत्या उन्हात जनावरांसाठी चारा छावणी उभारली. पशुपालकांनाही दुष्काळात अन्नाचा घास भरविला. नापिकी आणि दुष्काळाच्या शापातून तालुक्याची मुक्तता करण्यासाठी सिंचनाचा नांगर फिरवला. ट्रामा केअर सेंटर, असू दे की लोकसहभागातून उभारलेले कोरोना उपचार केंद्र. मंगेशदादांचा दातृत्व कंकण बांधलेला हात सदैव पुढेच राहिला. अत्यवस्थ रुग्णांसाठी त्यांनी याच काळात अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. कोरोना महामारीत त्यांनी स्थानिक रोजगार, व्यापार, उद्योग यांना बळ दिले.
जलसाक्षरता संमेलन, ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुरस्थित विठूरायाचे दर्शन, गरजू महिला, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीच्या मदतनीस आदि भगिनींना दिलेली प्रेमळ भाऊबीज भेट, शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी सुरु असलेली धडपड, कोरोनाने मृत झालेल्या किर्तनकाराच्या कुटूंबाचे पालकत्व. मंगेशदादांच्या शिवनेरी आणि अंत्योदयच्या गाभारी आलेला कुणीही रिकाम्या हातीने कधी परत जात नाही.
अडीच वर्ष चाळीसगावच्या संकल्पपूर्तीची, कोरोना व महापुराच्या आव्हानांची.!!!
या दोन वर्षात त्यांच्या लोकहितैषी कामांनी त्यांच्या प्रगतीपुस्तकावर भरगच्च नोंदी झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव शहराला स्वातंत्र्याच्या गेल्या 75 वर्षात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नसल्याने वृद्ध-दिव्यांग-महिला-वंचित दुर्बल घटक आदी सर्व स्तरातील नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी शहरात वेगवेगळ्या भागात असणाऱ्या शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले राजकीय वजन वापरत रेल्वे पुलाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागेवर भव्य अशी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या बहुचर्चित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी जवळपास १० शासकीय विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत. चाळीसगाव शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील १५ हजार चौरस मीटर जागा देखील यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यात प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, वनविभाग कार्यालय, महसुल कार्यालय उभारली जातील. तसेच प्रशासकीय सोयीसाठी सभागृह, संगणक व सर्वर कक्ष, सेतू सुविधा कक्ष, लोक अदालत कक्ष देखील यात असणार आहेत.
मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल हा महसूल प्रशासनाचा ग्रामीण भागातील कणा आहे. मात्र त्यांनाच काम करण्यासाठी हक्काचे कार्यालय नसल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेसाठीच्या सेवेवर होत असतो. आमदार मंगेश चव्हाण तालुक्यातील ३० तलाठी सजांच्या कार्यालयासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याची निविदाप्रक्रिया देखील झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांना थेट गिरणा धरण व वरखेडे धरणावरून पाणीपुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी नव्या सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ३ महिन्याच्या कालावधीत हौतात्म्य प्राप्त झालेले शहीद जवान यश देशमुख (पिंपळगाव), शहीद जवान सागर धनगर (तांबोळे खु., शहीद जवान संभाजी पानसरे (शिंदी), शहीद जवान अमित पाटील (वाकडी) यांच्या नावाने त्यांच्या मुळगावी चौक सुशोभिकरण व स्मृतीस्थळ उभारण्यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये असा एकूण १ कोटी २० लाखांचा निधी देखील मंजूर झाला आहे. केवळ बोलून नव्हे तर कृतीतून शहीद जवानांना आमदार मंगेश चव्हाण यांनी मानवंदना दिली
चाळीसगाव न्यायालयाच्या बाजूला विस्तारित इमारतीसाठी चार कोटी ८९ लक्ष रुपयांचा निधी मिळविण्यासह राज्य उत्पादन शुल्क इमारत बांधकामासाठी दोन कोटी ७२ लाख, ट्रामा केअर सेंटर बांधकामासाठी ४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजुर करुन घेतला. अल्पावधीत लोकसहभागातून कोरोना उपचार केंद्र उभारले. येथे आमदार निधीतून ५० खाटा, प्रायवायू वाहिनी, १०० रॅपिड अँटीजेन कीट, तालुक्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना PPE कीट, ग्रामीण रुग्णालयासाठी १२ हवा शुद्धीकरण प्लाझ्मा फिल्टर, खाटा व वैद्यकीय साहित्य शुद्धीकरणासाठी दोन अल्ट्रा व्हायलेट लाईट, आपापसात रोग व आग प्रतिबंधात्मक ४५ खाटांसाठी पडदे, सर्वसामान्य रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यासाठी यंत्रे, हायमास्ट लाईट्स पोल आदिंसाठी निधीचा ओघ कमी पडू दिला नाही.
चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांसाठी एक कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती. उसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे यासाठी १०० मुलांचे व १०० मुलींचे वस्तीगृह सुरु करण्यास शासनाची मान्यता मिळवून घेतली आहे.
जलक्रांती ते पथक्रांती – शिवनेरी फाउंडेशनच्या भूजल अभियानातून चाळीसगाव तालुक्यात नदी – नाले खोलीकरण व शेतरस्ते दुरुस्तीसाठी मोफत पोकलेन, जेसीबी मशीन उपलब्ध करुन दिले.
निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीना २० लाख रुपये विकासनिधी देण्याचा शब्द दिला होता. तो पहिल्याच वर्षी पाळत तालुक्यातील शिरसगाव, बाणगाव, गोरखपूर, ब्राम्हणशेवगे, मांदुर्णे, मुंदखेडे, हिंगोणे खुर्द येथे प्रत्येकी २० लाखांचे सभामंडप व बोरखेडा खुर्द येथे गावांतर्गत विकासकामांसाठी निधी मिळवून दिला.
आमदार निधीतून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात कोट्यावधींची विकासकामे त्यांच्यामाध्यमातून सुरु आहेत. विरोधी पक्षातील आमदार असूनदेखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत गेल्या अडीच वर्षात काम सुरु असलेली व मंजूर झालेली ७० कोटी रुपयांची रस्ते व पूल विकास कामे प्रत्यक्षात सुरु देखील केली. जनतेचा विश्वास जिंकत मतदारसंघाचा विकास साधणारा धडाकेबाज “मंगेश पॅटर्न” चाळीसगावकरांच्या मनात कोरला गेला असल्याचे त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेवरून लक्षात येतो.
महापुरात जनतेसाठी २४ तास फिल्डवर,
शासकीय मदतीची वाट न पाहता ५० पूरग्रस्तांना उभारला हक्काचा निवारा…
चाळीसगाव तालुक्यात अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती ऑगस्ट च्या शेवटच्या व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोजी निर्माण झाली, ढगफुटीसदृश्य पावसामुळे चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ६९ गावांना या महापुराचा फटका बसला. मात्र आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आमदार मंगेश चव्हाण यांनी महापुराची बातमी तालुक्यात पोहचत नाही तोपर्यंत प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतत १५ दिवस पायाला भिंगरी लावून नुकसानग्रस्त चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला व कोकण – पश्चिम महाराष्ट्रच्या धरतीवर चाळीसगाव पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी सर्वप्रथम मागणी केली. अनेक कुटुंबांचे घर – संसार वाहून गेल्याने त्यांची अवस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पाहिली गेली नाही. त्यांनी महापुराच्या दुसऱ्याच दिवशी गरजू ५० बेघर पूरग्रस्तांना ८ दिवसात घर बांधून देण्याचे जाहीर केले व दिलेल्या शब्दाला जागत त्यांना हक्काचे घर देखील ८ दिवसात उभे करून दिले.
अनेक गावांचे रस्ते व पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता त्या गावांना स्वखर्चाने जेसीबी आदी उपलब्ध करून देत त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडले. जैन उद्योग समूहासह इतर उद्योगांना विनंती करून पूरग्रस्तांना अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. महापुरात जनतेसाठी २४ तास फिल्डवर राहून त्यांना आधार देणाऱ्या, वेळेची गरज लक्षात घेत स्वखर्चाने हक्काचे छत व मदत उपलब्ध करून देणाऱ्या जनसेवक आमदारांमुळे संकटात असणाऱ्या तालुक्याला यामुळे उभारी मि