राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगर वतीने मूळजी जेठा महाविद्यालय येथे वस्तीगृह समितीची घोषणा करण्यात आली. 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट अभाविप तर्फे संघटनात्मक सप्ताह राबविण्यात येणार आहे यात महानगर, नगर, शहर, महाविद्यालय व विविध वसतिगृह यांची कार्यकारणी घोषणा करण्यात येणार आहे. त्याच संघटनात्मक सप्ताह च्या अनुषंगाने वस्तीगृह समिती घोषित करण्यात आली. शाखा घोषणा करण्यासाठी, प्रमुख वक्ते म्हणून चैतन्य बोरसे उपस्थित होते. येणाऱ्या काळात अभाविप महविद्यालातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे. यामधे प्रश्न शोध मोहीम, वृक्ष लागवड अभियान, मिशन साहसी तसेच विवध विषयांवर अभ्यास मंडळ राबवणार आहे असे बोलातना सांगितले. वस्तीगृह अध्यक्ष – शिवम पाटील, वस्तीगृह उपाध्यक्ष – ऋषिकेश काळे, वस्तीगृह सचिव – भाग्येश महाले, कार्यक्रम प्रमुख -आकाश पाटील, कार्यक्रम सह प्रमुख – टिनू बारी, अभ्यास मंडळ प्रमुख – सुरज परदेशी, कलामंच प्रमुख -उदय माळी, S.F.D प्रमुख – यशोदिप पाटील, S.F.D प्रमुख सह प्रमुख- प्रेमकुमार पवार, S F S प्रमुख – प्रतिक चौधरी, वस्तीगृह संपर्क प्रमुख-प्रशांत पाटील. यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी अभाविपचे शिवा ठाकूर, नितेश चौधरी, जिल्हा संयोजक मयूर माळी, अश्विन सुरवाडे, मंगेश ढगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.