(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) यशाच्या धुंदीत हुरळून न जाता, क्षणाचा विलंब न करता तात्काळ कामाला लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील असल्याची प्रतिक्रिया महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. जळगाव शहरातील शांतता व सुरक्षा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगला पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील विविध समस्यां मांडल्या.
जळगावच्या महिला कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी मनापासून कार्य केले आहे. काही दिवसापूर्वी शहरातील माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांना दूरध्वनी करून त्यांनी एका महिला कार्यकर्त्याच्या नवऱ्याला होणाऱ्या त्रासासंबंधी माहिती दिली होती. संबंधित व्यक्तीला डोळ्यांचा खूप त्रास होत होता, परंतु हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. परंतु मंगला पाटील यांनी ही सर्व परिस्थिती माजी आमदार जगवाणी यांना सांगून सिंधी कॉलनीतील नेत्रज्योती हॉस्पिटलमध्ये संबंधी रुग्णाला दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी संबंधीत रुग्णावर उपचार करून त्यांना दिलासा दिला. मंगला पाटील यांनी संजय गांधी निराधार योजना संबंधीचे फायदे महिलांना जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे.