चाळीसगाव राजमुद्रा दर्पण – शहर व तालुक्यातील बहुतांश जनतेचा वापर असलेला तसेच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंना जोडणारा दुवा म्हणजे चाळीसगाव शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिज पूल होय, हा पूल म्हणजे चाळीसगाव शहराची ओळख बनली असून दिवसभरात हजारो वाहने यावरून जातात. तसेच सदर पुलावर एका बाजूने फुटपाथ असून त्यावरून ग्रामीण रुग्णालयात जाणारे रुग्ण, महाविद्यालयीन विद्यार्थी यासह हजारो पादचारी जात येत असतात.
या रेल्वे पुलाच्या फुटपाथच्या बाजूने पथदिवे नसल्याने रात्री अपरात्री जाणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. हीच बाब लक्षात घेऊन *चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चाळीसगाव रेल्वे पुलावर आकर्षक अश्या पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.* सदर पथदिव्याना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने रात्री पुलाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानपरिषद आमदार चंदूलाल पटेल यांच्या निधीतून ३६ लक्ष रुपये मंजूर केला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मालेगाव रोड हॉटेल आशिष, जुना मालेगाव नाका पर्यंतच्या रस्त्यावर हे पथदिवे बसविले जाणार आहेत.