जामनेर:- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा पहूर येथे संपन्न झाली. पहूर पेठच्या सरपंच निता पाटील,या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या .यावेळी माजी जि.प सदस्य राजधर पांढरे,माजी पंचायत समिती सदस्य प्रदिप लोढा,उपसरपंच श्याम साबळे,आत्मा समिती सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावना तालुका कृषि अधिकारी डाँ.अभिमन्यू चोपडे,यांनी केली.प्रमुख मार्गदर्शक म्हणून सागर बंड,किरण मांडोळे,मनीषा पाचपोळ विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद,जिल्हा संसाधन व्यक्ती वैभव बोंद्रे. कार्यशाळेत विविध पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन,बदलत्या हवामानानुसार करावयाच्या उपाययोजना ,खत व्यवस्थापन,खत बचत,सेंद्रीय शेती व सूक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत येणारे विविध उद्योग, लाभार्थी पात्रता ,मिळणारे अनुदान या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी निता घार्गे ,कृषी पर्यवेक्षक कन्हैया महाजन ,तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा राकेश पाटील,पी.पी.पवार कृषी सहाय्यक व तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व परिसरातील शेतकरी व महिला उपस्थित होते.सूत्रसंचलन पी.एस पाटील यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.