जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील शिवाजीनगर भागातील मनपा रुग्णालयात लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण पूर्णतः ठप्प झालेले आहे. सकाळी सहा वाजेपासून नंबर लावल्यावर देखील लस मिळत नसल्याने नागरिक रोष व्यक्त करताना दिसून येत आहे यासंदर्भातील व्हिडिओ राजमुद्रा ला स्वतः काढून शिवाजीनगर येथील स्थानिक रहिवाशांनी व्हाट्सअप वर पाठवल्याने सत्य परिस्थिती बाहेर आली आहे. सतत सुरू असणारा लसीचा तुटवडा याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. महापालिकेने तात्काळ दखल घेऊन लसीचा पुरवठा करावा अशी मागणी शिवाजीनगर येथील रहिवाशांनी केली आहे.
शहरातील शाहू महाराज रुग्णालय, चेतन दास रुग्णालय या ठिकाणी लसीकरण सुरू असताना शिवाजी नगर येथे लस का? अपूर्ण पडत आहे असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला स्थानिक लोकप्रतिनिधी आरोप-प्रत्यारोप व्यस्त असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्येकडे बघायला वेळ नाही आरोप-प्रत्यारोप सोडून लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्याकडे लक्ष केंद्रित करावे असे यावेळी स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
वयोवृद्ध नागरिक सकाळपासून लाइन लावून उभ्या असताना त्यांना सरळ बस संपली आहे असे सांगण्यात येते यामुळे नाईलाजाने घरी जाण्या शिवाय पर्याय राहत नाही अशी परिस्थिती दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालयाची झाली असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे लसी पुरवठा करिता आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे धर्मराज फाउंडेशन च्या माध्यमातून वेळोवेळी लसीकरण केंद्र करिता पाठपुरावा करण्यात आला मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची फरफट होत आहे.