(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) इकरा एज्युकेशन सोसायटीच्या सरचिटणीस पदी स्वर्गीय गफ्फार मलिक यांचे पुत्र एजाज मलिक यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत काल (ता. १७) हा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, डॉ. इक्बाल शाह, अब्दुल रशीद, अमिनुद्दिन शेख, अब्दुल रउफ शेख, डॉ.अमानुल्ला शहा, जफर शेख, मजीत जकारिया, शेख गुलाब नबी तसेच डॉ. ताहेर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी एजाज मलिक यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.