जळगाव, दि.३० – शहरातील शनीपेठेतील जय श्रीराम मित्र मंडळाची श्री गणेशोत्सव बैठक नुकतेच पार पडली. मंडळाचे यंदाचे २१ वे वर्ष असून बैठकीत अध्यक्षपदी मोहित प्रजापती तर उपाध्यक्षपदी हर्षल चौधरी यांची तर सचिवपदी ललित चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शनीपेठेतील शनिमंदिरजवळ असलेल्या जय श्रीराम बहुउद्देशीय मित्र मंडळाचे यंदा २१ वर्ष असून मंडळाने अनेक सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या आरास सादर केल्या आहेत. मंडळातर्फे परिसरात दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत यंदा कमी खर्चात गणेशोत्सव साजरा करुन उर्वरीत रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंडळाच्या कार्यकारणीत कार्याध्यक्ष मयूर चौधरी, खजिनदार ताराचंद जोशी, मंडळप्रमुख निलेश पाटील, सदस्य कृष्णा देवरे, भूषण चौधरी, चेतन वाणी, सचिन चौधरी, तुषार भामरे, हेमंत देवरे, मयूर चौधरी, उमेश वाणी, अक्षय जोशी, मयूर भट, राकेश जोशी, शिवाजी चौधरी, राहुल चौधरी, विजय देवरे, कमलेश देवरे, निलेश सोनार, जितेंद्र देवरे,, विवेक भट, पवन चौधरी, गोपाल देवरे, गणेश देवरे आदींसह इतर सदस्यांचा समावेश आहे.
जय श्रीराम बहुउद्देशीय मंडळाच्या श्रींचा आगमन सोहळा दि.३१ रोजी दुपारी ४ वाजता महर्षी वाल्मिक मंदिरापासून होणार आहे. विसर्जन मिरवणूक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ मिरवणुकीत दुपारपासून असणार आहे.