बुलढाणा राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – शिवसेनेचे ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाल. शिवसेनेचे पक्ष प्रमुखांनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या होत्या. यादरम्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजिन करण्यात आला होता. त्याचवेळी हा राडा झाला आहे. दरम्यात राडा घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. भयंकर तणाव यावेळी ह्या दोन घटात निर्माण झाला होता. शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरेंनी नवनिर्वाचित नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते दोघांमध्ये यावेळी भयंकर राडे झाल्याचं पाहायला मिळालं. हा तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेरसगळी शक्ती पणाला लाऊन जमावावर लाठी चार्ज केला.
नेमकं काय घडलं होत ? :-
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातल्याच सांगितल्या जात आहे. आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा चालू असताना त्या कार्यक्रमात घुसले व संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून पदाधिकाऱ्यांना मारहाण सुरू केली त्यामुळे हा गोंधळ उडाला.
पोलिसांसमोरच हा राडा करण्यात आला, यादरम्यात पोलिसांनी लगेच च हस्तक्षेप करून लाठी चार्ज केला. ठाकरे गटाकडून झालेल्या जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती साठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही खर्या शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यात शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोन्ही गट आमनेसामने भिडले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा राडा शांत करण्याचा प्रयत्न केला.