जळगाव राजमुद्रा दर्पण – जळगाव शहरातील राज वाईन्समध्ये एक्स्पायरी डेट ची बिअर सापडली असून, याबाबत मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून अम्स्टल बिअरच्या 124 बाटल्या आणि मुदत संपलेल्या 500 मिली बिअरच्या 10 टीन जप्त करण्यात आल्या आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील अशोक किराणाजवळ राज वाईन नावाचे दारूचे दुकान आहे. दुपारी येथे काही तरुण बिअर पीत होते. त्यांच्यातील एकाला बिअर पिल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्याची नजर बिअरच्या बाटलीवर पडली तेव्हा ती एक्सपायर झालेली आहे आहे त्याच्या लक्षात आले,त्यांनी लगेच तक्रार केली. तक्रार होताच जळगावच्या भरारी पथकाने दुकानाची झडती घेतली, व त्यांच्याकडे अम्स्टेल बिअरच्या 124 बाटल्या आणि 10 एक्सपायर्ड 500 मिली टिनच्या कॅन आढळून आले. दरम्यात या पथकाने पंचनामा करून या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कार्यवाहीसाठी दोषारोपपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
बिअर हा अल्कोहोलचा सर्वात सामान्य प्रकार आहे. त्याची एक्सपायरी डेट आधीच बाटलीवर लिहिलेली असते. त्यामुळे लोकांना सहसा कल्पनाही असते. बिअरचे कॅन किंवा बाटल्या, एकदा उघडल्या की, एक-दोन दिवसांत ती प्यायला पाहिजेत. एकदा उघडल्यानंतर हवेतील ऑक्सिजन बिअरच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्याची चव खूप घाण आणि खराब होते तसेच, एक दिवसानंतर बिअरची फिझ बंद होते.