(राजमुद्रा वृत्तसेवा) बी एच आर प्रकरणात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असून याची चौकशी शासनाकडून करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, याबाबत २०१८ मध्ये ऍड. कीर्ती पाटील यांनी मागणी केली होती, सोबतच केंद्रीय सहकार मंत्री यांनीही ‘शासनाकडे चौकशी द्यावी’ असा आदेश दिला होता. मधल्या काळात हे प्रकरण मंदावले होते मात्र आता त्याने जोर धरला असून यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येणार असल्याचे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी आज व्यक्त केले.
ऍड. किर्ती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्यांच्यावर कठोर शासन होईल. हा राजकीय विषय नसून हा ठेवीदारांच्या संरक्षणाचा तसेच सुरक्षिततेचा विषय आहे. या गैरव्यवहारात हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संसारही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या कडून जर पैसा उपलब्ध झाल्यास तर काही प्रमाणात ठेवीदारांना हा पैसा परत करता येईल असेही खडसे यांनी सांगितले यांनी सांगितले.
या चौकशा हा राजकीय विषय नसून माझ्या स्वतःच्या काही मोठ्या चौकश्या झाल्या असून मी कुठलाही गुन्हा केला नसताना जर माझ्या इतक्या चौकशा होऊ शकतात आणि हा राजकीय विषय असू शकत नाही तर हा राजकीय विषय कसा असू शकेल असेही खडसे म्हणाले.