जळगाव राजमुद्रा | शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीचा प्रभाव श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसून आला आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रभावानंतर मोकळ्या वातावरणात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद जळगावकरांनी अनुभवला मात्र यामध्ये राज्यात झालेल्या शिवसेनेतील बंडखोरीतील शिंदे गट व शिवसेनच्या स्वागत मंचाची सर्वाधिक चर्चा गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठया प्रमाणात रंगताना दिसून आली आहे.
शिवसेनेतील बंडखोरी नंतर प्रथमच जळगाव शहरात सार्वजनिक उत्सवामध्ये शिंदे गट मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसून आला आहे. विसर्जन मिरवणुकीत सामील झालेले जळगाव शहरातील गणेश मंडळ यांचा विविध संस्था राजकीय पक्षांच्या स्वागत मंचावरून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरात ही परंपरा सुरू आहे. यामध्ये शिंदे गटाची अधिक भर पडली आहे.
महानगर प्रमुखाचे दावेदार असलेले निलेश पाटील यांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या वतीने जळगाव शहरातील गणेश मंडळांचे स्वागत मंचावरून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला विशेष म्हणजे स्वागत मंच मूळ शिवसेनेच्या स्वागत मंचापासून शंभर फूट अंतरावर उभारण्यात आल्याने जळगावकर नागरिकांमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेची जोरदार चर्चा रंगाचे पाहायला मिळाले आहे.
इतर राजकीय विरोधा अधिक संघर्ष शिंदे गट व ठाकरे यांच्या शिवसेनेत सुरू आहे. कायदेशीर लढाई राज्यात दोन्ही गटात सुरू आहे. मूळ शिवसेना कोणाची याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय देईलच मात्र त्या आगोदर शिंदे गट व ठाकरे यांची शिवसेना यांचा जळगाव शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्वागतच मंच आगामी काळातील तीव्र राजकीय संघर्षाचे संकेत देत असल्याचे स्पष्ट आहे.
ब्रेकिंग न्युज : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यात येणार ..