राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रकांत पाटील यांच्या भव्य कार्यक्रमासाठी येत्या 20 तारखेला (मंगळवार 20 सप्टेंबर) रोजी मुक्ताईनगर येथे येणार आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मात्र यावर्षी वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार 14 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी होनार आहे.
जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही समावेश होणार आहे. यातून आमदार चंद्रकांत पाटील जबरदस्त ताकद दाखवणार आहेत , आता मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील निमगावजवळ आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे
नवीन सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे फडणवीस पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहरांच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात मुख्यमंत्री काय घोषणा करतात आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेचे आमदार झाल्यानंतर विधान परिषदेत केलेल्या भाषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे काय बोलनार ! याकडे समस्त जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
यादरम्यान, शुक्रवारी व शनिवारी आमदार पाटील यांनी अधिकारी व सहकाऱ्यांसह मैदानाची पाहणी केली. अफसर खान, राजेंद्र हिवराळे, पंकज राणे, गोपाल सोनवणे, संतोष मराठे, मुकेश वानखेडे, गणेश टोंगे, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, तुषार बोरसे, नीलेश शिरसाठ, आरिफ आझाद, शुभम शर्मा, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता आयबी शेख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित होते