जळगाव राजमुद्रा दर्पण – जळगाव मधील शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारी शहराजवळील गिरणा नदीवरील कांताई धरणावर फिरण्यासाठी गेले होते. यादरम्यान अचानक एका मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. चार मुले एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहत होती. यातील तिघांना वाचवण्यात यश आले आहे तर एकाचा शोध सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर परिसरामधील दूध महासंघाजवळील मिथिला अपार्टमेंटमधील 10 ते 15 मुले रविवारी कांताई बंधारा नागाई जोगाई मंदिर परिसरा पिकनिक साठी गेली होती. यावेळी ही घटना येथे घडली . समिक्षा विपीन शिर्डूकर (वय 17), योगिता दामू पाटील (वय 20) आणि सागर दामू पाटील (वय 24) यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. नयन योगेश निंबाळकर (वय 14) याचा शोध अजूनही सुरूच आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सुटका करण्यात आलेल्या तीन मुलांना खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, दुपारी मुसळधार पावसाने नागाई-जोगाई मंदिर परिसरात गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.