राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. जिथे काल सोन्याच्या दरात घसरण झाली होती, तिथे आज सकाळपासूनच भावात वाढ झाली आहे. काल जिथे सोने स्वस्त झाले होते तिथेच चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने सोमवारी 50658 रुपयांवर स्वस्त झाले, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत सोमवारी 55076 रुपये झाली होती.
22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव :-
आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹4,690, तर 8 ग्रॅमची किंमत ₹37,520, 10 ग्रॅमची किंमत ₹46,900, तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत ₹4,69,000 आहे.
महत्त्वाचे :-
सोन्याचे भाव दर दिवसातून दोन वेळा अपडेट होतात , एकदा सकाळी आणि नंतर संध्याकाळी , संध्याकाळी जो भाव अपडेट होतो तोच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असतो . सोन्याचे भाव हे संपूर्ण भारतात IBJA आणि MCX या अधिकृत वेबसाईट द्वारे अपडेट केले जातात..