राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – जीएसटीबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सरकारने 18 जुलैपासून जीएसटीचे नियम बदलले आहेत. या नियमांनुसार, तुम्ही भाड्याने राहत असल्यास, तुम्हाला भाड्याच्या व्यतिरिक्त 18% GST भरावा लागेल. व्हायरल होत असलेली बातमी वाचून भाडेकरू चांगलेच चिंतेत पडले आहेत.
पीआयबीच्या फॅक्ट तपासणीत वास्तव उघड झाले :-
जर या मेसेजच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर १०,००० रुपयांच्या भाड्याच्या बदल्यात तुम्हाला १८% जीएसटीसह ११,८०० रुपये द्यावे लागतील. या व्हायरल मेसेजची पीआयबी फॅक्ट चेकने चौकशी केली असता, ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले. PIB फॅक्ट चेकने सांगितले की, घर भाड्यावर १८% GST लावण्याच्या बातम्या निराधार आहेत. याशिवाय यावर सरकारचे वक्तव्यही आले आहे.
वैयक्तिक वापरावर कोणताही जीएसटी देय नाही :-
पीआयबीने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘निवासी युनिटचे भाडे तेव्हाच करपात्र आहे जेव्हा ते जीएसटी नोंदणीकृत कंपनीला व्यावसायिक कारणांसाठी दिले जाते.’ कोणी वैयक्तिक वापरासाठी भाड्याने घेतल्यास जीएसटी भरावा लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नियम काय म्हणतो :-
जीएसटी बैठकीनंतर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने व्यवसायासाठी निवासी मालमत्ता भाड्याने घेतली तर त्याला जीएसटी भरणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पगारदार वर्गाचे निवासी घर किंवा फ्लॅट भाड्याने देण्यावर जीएसटी भरावा लागत नाही. नोंदणीकृत व्यक्ती किंवा संस्था व्यवसाय करत असतानाच GST भरणे आवश्यक आहे.