(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर ओ बी सी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मोठा पेचप्रसंग उभा ठाकलाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या ठाकरे सरकार समोर ओ बी सी आरक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ओ बी सी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारवर हल्ला बोल केला आहे.
कोरोना परिस्थितीत आणि इम्पिरीकल डाटा गोळा करण्याचा संबंध लावने चुकीचे असून सरकार मध्ये मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय असा सवालही त्यांनी केला. तसेच २६ जून रोजी चक्क जाम आंदोलनाची हाकही त्यांनी दिली आहे.