जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याचे फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होत आहे. अश्या जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी मी कालंच संध्याकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. मात्र मला प्राप्त माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. मात्र ही थातूर मातुर कारवाई करून अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस अधिक्षक करीत आहेत की काय अशी शंका निर्माण असल्याचा आरोप आमदार महेश चव्हाण यांनी केला आहे
आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ठेवावी व सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबना बाबत कारवाई करावी तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.