जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेला बीएचआर घोटाळ्यात राज्यातील विरोधीपक्षाच्या निकटवर्ती असलेल्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली अगदी त्याच पद्धतीने राज्यात सत्ता असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीतील नेत्यांच्या निकटवर्तीय असणारे देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, या वृत्तामुळे अनेकांनी दिग्गज विधी तज्ञ यांचा कायदेविषयक सल्ला घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात आणखी मोठे अटक सत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून राबविण्यात येणार आहे.
दरम्यान , दरम्यान बीएच आर घोट्याळ्यात अटक केलेल्या 12 संशयित आरोपींपैकी आज 9 संशयित आरोपींना पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या सर्व संशयितांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकार पक्षाकडून ऍड प्रवीण चव्हाण यांनी संशयितांना पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार व्यक्तिवाद केला घरकुल प्रकरणात देखील ऍंड प्रवीण चव्हाण यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली होती. यामुळे अनेकांना जेल वाऱ्या भोगाव्या लागल्या आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने कमालीची गुप्तता पाळत संशयिताना जाळ्यात खेचेले जळगाव शहरात सकाळीच दिग्गज व्यापारी व व्यावसायिक यांना ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र पाटील यांना देखील प्रकरणात अटक झाली आहे.
barkin ladi https://fmohconnect.gov.ng/policy_planning.html