पुणे राजमुद्रा : महाराष्ट्रात धक्कादायक अशा घटना सध्या सामोरे येत आहे. आणि यामुळे सामाजिक जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम देखील होत आहे. काही विशेष चिंतेचे आहेत तर काही विषय कोंडी करणारे आहेत पुण्यात लैंगिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची ऑनलाइन बुकिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ मातली आहे. याबाबत सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांच्या व्यासपीठावरून जाहिरात पायऱ्याल करण्यात आली आहे. या संदर्भातला मेसेज देखील सोशल मीडियावर फिरत आहे सत्यम शिवम सुंदरम फौंडेशनच्या वतीने या प्रशिक्षणाची जाहिरात दिल्याचे समोर येत आहे.
या जाहिरातीमुळे अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्ष नेमकं काय प्रकरण आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील सकल चौकशी केली जाणार असल्याचे समजते आहे. या जाहिरातीमध्ये नेमकं किती तथ्य आहे. हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असून सोशल मीडियावर मात्र ही जाहिरात नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. ज्या संस्थेकडून ही जाहिरात देण्यात आली आहे. त्या संस्थेची देखील चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. नेमका जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा उद्देश काय हे देखील तपासले जाणार आहे.