जळगाव राजमुद्रा : दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ अर्थ शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सोडून आहे या वादामध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण अधिक तापणार आहे जळगाव दौऱ्यावर असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे गटाची चांगलीच खरडपट्टी केली आहे.
चुन चुन के मारेंगे या शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी विरोधकांना इशारा दिला होता, त्यांच्या टीकेला आज अजित पवारांनी आपल्या खास वक्तृत्व शैलीमध्ये समाचार घेतला आहे.यांचेच आमदार हवेमध्ये गोळ्या उडवतात यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हातपाय तोडण्याची शिकवण देत आहे, तसेच यांचे आमदार कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम देखील करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब जर असते तर बिन पाण्याने केली असती.. असं म्हणत दसरा मेळाव्याचा घाट घालण्याच्या प्रयत्ननात असलेल्या शिंदे गटावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही, एकही आमदार कमी झाला तर हे सरकार पडेल अशी भविष्यवाणी अजित पवार यांनी जळगाव येथे केली आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्था आहे. त्यामुळे राज्यभरात कार्यकर्त्यांनी पक्षाला ताकद देण्यासाठी सज्ज राहायचे असून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा सल्ला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जळगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे.