मुंबई राजमुद्रा | तुम्ही जर शासनाचा तसेच केंद्र शासनाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी असाल तर तुम्हाला दोन लाखाच्या विम्याचे कवच मिळणार आहे. केंद्र शासनाच्या श्रमिक योजनेमध्ये जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारतर्फे ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. विमा खरेदी करणे यांच्या साठी आवाक्या बाहेर आहे, अशा कामगारांसाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे
असंघटित कामगारांना आधार मिळावा यासाठी केंद्र सरकार तर्फे श्रमिक योजना सुरू करण्यात आली, यामुळे यामधून विविध योजनांचा लाभ तसेच सरकारकडून देण्यात येणारे भत्ते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विम्याचा लाभ मिळणार आहे. ई – श्रमिक काळ तयार करण्यासाठी जवळील सेतू सुविधा केंद्र मध्ये श्रमिक कार्ड देखील तयार करता येते याचा फायदा वरील योजनांसाठी होणार आहे.
कामगारांना ईश्रम पोर्टलवर सर्वात अगोदर नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र देखील सेतू सुविधा केंद्रातून मिळणार आहे. यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड या कागदपत्रांची अत्यावश्यक गरज नोंदणीसाठी असणार आहे. नोंदणी झाल्यावर पुढील अपडेट नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे.
कामगारांना कर्तव्यावर असताना दुखापत अथवा काही घटना घडल्यास दोन लाखाचे विमा कवच या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी ई – श्रमिक योजनेत आपले नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.