जळगाव राजमुद्रा | खेडी खुर्द या गावात तमाशा मध्ये नसतानाचा व्हिडिओ एका पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. भटू वीरभान नेरकर असे या वादग्रस्त कर्मचाऱ्याचे नाव असून व्हिडिओमध्ये तमाशात ठुमके लावताना हा पोलीस कर्मचारी दिसून येत असल्याने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या निवृत्ती नगरातील भावेश उत्तम पाटील (रा.आव्हाने) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणातील भूषण रघुनाथ सपकाळे ( 32 )मनीष नरेंद्र पाटील (22 दोघे रा. खेडी खुर्द) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील भूषण याने घटना घडण्याच्या काही दिवसापूर्वी खेडी खुर्द या गावात तमाशाचे आयोजन केले होते, असे असताना पोलीस कर्मचारी भटू वीरभान नेरकर याच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यांनी तमाशामध्ये जाहीर रित्या ठुमके लावले होते भटू विरभान नेरकर या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.पोलीस कर्मचारी नेरकर याच्या सोबत असलेल्या तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी याची देखील चौकशी पोलीस अधीक्षकांकडून केली जात आहे, यामध्ये सहभाग आढळल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील निलंबन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.