मुंबई राजमुद्रा | बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न असलेल्या एका गुन्हेगारास मानखुर्द पोलिसांनी मुद्देमाला सह अटक केली आहे. युट्युब वर पाहून नोटा कशा पद्धतीने छापायच्या याचा सराव करून तो मोठा छापत होता. मात्र चलनात आणण्याच्या अगोदरच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मानखुर्द ज्योतिर्लिंग नगर परिसरामध्ये एका खोलीत बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली या पार्श्वभूमीवर पाच दिवस परिसरात पाळत ठेवून आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.
रोहित शहा या (22 वर्षीय) तरुणाला नोटा छापताना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 50, 100,200 अशा एकूण सात लाख 16 हजार 150 रुपयाच्या नोटा पोलिसांनी जप्त केले आहेत. यासोबत नोटा छापण्यासाठी लागलेले प्रिंटर्स स्कॅनर कलर्स लॅपटॉप असा मिळून नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपी हा अल्पवयीन मानला जात असला तरी बारावीपर्यंत त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
आरोपी रोहित शहा यांनी युट्युब वर प्रशिक्षण त्यानंतर मानखुर्द परिसरात एका खोलीत बनावट नोटा छापण्याची सुरुवात केली, या प्रकरणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याच्यावर गुप्तपाळत ठेवून अनेक पोलीस कर्मचारी या कारवाई मोहिमेत सहभागी झाले होते. अतिशय तल्लख बुद्धीने हे प्रकरण पोलिसांनी हाताळल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र आरोपी रोहित शहा याची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. आतापर्यंत किती पैसे छपाई केली याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत माझ्या लक्षात नाही, असं उत्तर पोलिसांना दिले आहे. त्यामुळे आणखी काही बनावट नोटा बाहेर दिल्या आहेत का ?याबाबत पोलिस आता चौकशी करित आहे.