जळगाव राजमुद्रा | नुकताच राष्ट्रवादीचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांचे कान देखील पक्ष वाढीसाठी गुंतले मात्र याचा काही परिणाम झालेला दिसून येत नाही, जळगाव आतील कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी खाजगीत बोलून दाखवली मात्र थेट अजित पवारांपर्यंत जाणार तरी कोण ? आणि तक्रार करायची कशी ? या डळमळीत कार्यकर्ते पदाधिकारी राहिले, कारण गटबाजीची बुरशी राष्ट्रवादीमध्ये आहेच मात्र हे संपणार कधी ? कारण या प्रमुख समस्यामुळेच राष्ट्रवादीतला कार्यकर्त्याची मुस्कटडाबी होत असल्याची परिस्थिती आहे उघडपणे राष्ट्रवादीतील नेता पदाधिकारी हे मान्य करत नसले तरी हे अटळ सत्य आहे. असं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त वाटत होतं मात्र त्यातही अपेक्षा फोल ठरल्या आहेत.
छत्रपती संभाजी नाटकगृहामध्ये राष्ट्रवादी महानगर कडून जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते असे असताना नेत्यांच्या भाषणामध्ये अनेक मतमतांतरे दिसून आली आहे. थेट विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासमोर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना टोले आणले आहे. यामध्ये माजी पालकमंत्री सतीश आण्णा पाटील यांचे भाषण सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला त्यांनी थेट अजित पवारांवर बोट हाजी – आजी करणाऱ्यांना सध्या पक्ष स्थान असल्याचे बोलून दाखवले आहे. पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक विकास कामे केली मात्र पक्षाकडून पाहिजे तेवढे दखल घेतली गेली नाही अशी नाराजी देखील सतीश आण्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात निष्ठावंतांचा विचार व्हावा असे देखील सतीश पाटील अजित पवारांसमोर म्हणाले आहे.
खडसे यांनी देखील सतीश पाटील यांचे भाषण झाल्यावर त्यांना कोपरखळ्या मारल्या आहेत सतीश अण्णा मंत्री असताना राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले, मात्र राष्ट्रवादीची संख्या कशी कमी झाली ? याला सर्वस्वी जबाबदार नाथाभाऊचा आहे. कारण मी तेव्हा भाजपमध्ये होतो, आणि पक्ष संघटन वाढीसाठी मी त्या कालखंडात काम केलं म्हणूनच राष्ट्रवादीतील जागा कमी झाल्या, विधानसभेच्या जागा आज वाढवण्यासाठी राष्ट्रवादीत संघटन मजबूत करायचे आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याची गरज आहे, एकाच वेळी जेव्हा विरोधकांवर तुटून पडू तेव्हाच आगामी काळात यश शक्य आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे खडसेंनी म्हटले आहे.
नेत्यांची झालेली तडाखेबाज भाषण यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर दिसून आला मात्र यामध्ये विरोधाभास देखील मोठ्या प्रमाणात दिसून आला कारण नेत्यांनी फक्त एकमेकांना कोपरखळ्या मारण्यातच धन्यता मानली, कोण कसा कमी हे दाखवण्याचा प्रयत्न नेत्यांच्या भाषणातून झाला मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सगळ्यांचीच कान उघाडणी केली, नुसते भाषणातून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार नाही, तर त्यासाठी संघटन आणि पक्षाला निवडणुकांमध्ये यश मिळणे गरजेचे आहे. असे कान अजित पवारांकडून नेत्यांची टोचण्यात आले, खरा कार्यकर्ता मागेच असतो मात्र चहा पाण्याला बोलवणारे बिनकामाचे असतात असा टोला देखील अजित दादांनी काही नेते व पदाधिकाऱ्यांना लगावला आहे.
जळगाव जिल्हा बँकेची सार्वत्रिक सभा पार पडली यामध्ये माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामध्ये चांगलेच फाटलेले दिसून आले, खडसे यांनी बँक चांगल्या स्थितीत असल्याचे बोलून दाखवणे तर देवकरांनी बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले नेत्यांच्या मतमतांतर तसेच राजकीय स्पर्धेमुळे अनेक कार्यकर्त्यांना उघडपणे पक्षाचे समर्थन करण्यात देखील अवघड जात असल्याची परिस्थिती आहे. नेत्यांमध्ये सुरू हसलेला कलगीतुरा तर आगामी काळ पक्षासाठी अधिक संघर्षाचा असणार आहे. या उलट भाजपला राष्ट्रवादी मधील गटबाजी लाभदायी ठरेल अशी परिस्थिती सध्या तरी आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी गटातटाचा राजकारण आहे. हे सर्वश्रुत असताना मात्र आता राष्ट्रवादी म्हणून आगामी निवडणुका लढण्याची गरज कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.