(यावल राजमुद्रा वृत्तसेवा) शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आज सकाळी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालया जवळील शासकीय गोदामावर काटा पूजन व धान्य पूजन करून करण्यात आला.
कार्यक्रमाला यावल तहसीलदार महेश पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रवी सोनवणे, युवा सेना तालुका अधिकारी गोटू सोनवणे, उपतालुकाप्रमुख योगेश पाटील, आडगाव बारसिंग बारेला, रोहिदास महाजन, दिनेश साळुंके, सुधाकर आबा पाटील, भरत चौधरी, आशिष झुरकाळे, पराग महाजन, भरत चौधरी, सूर्यभान पाटील, पप्पू जोशी, सुनिल बारी, योगेश चौधरी, संतोष वाघ, योगेश पाटील, समाधान सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, प्रवीण महाजन, नाना धनगर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.