जळगाव राजमुद्रा | सालाबादाप्रमाणे यंदा देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगरसेवक राणे दापत्याकडून फराळाचे वाटप करण्यात आले आहे गेल्या पाच वर्षापासून नगरसेविका गायत्री राणे व इंद्रजीत राणे यांच्या माध्यमातून गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फराळ वाटपाच्या कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी त्यांना परिवारासह कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत असल्याने यंदा देखील या कार्यक्रमाला भव्य स्वरूप आले होते.
जळगाव शहराची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे यामध्ये काही कर्मचारी रोजंदारीवर असून काही कर्मचारी कायमस्वरूपी महापालिकेत सेवेत आहे मात्र आपलं दायित्व म्हणून सफाई कर्मचारी शहराच्या भवितव्यासाठी आपले योगदान देत आहे. हीच जाणीव ठेवत नगरसेविका गायत्री राणे व इंद्रजीत राणे या दापत्याने सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्ताने यथोचित सन्मान करून सफाई कर्मचाऱ्यांना भूषवले आहे.
कार्यक्षम नगरसेविका म्हणून गायत्री राणे यांचे नावलौकिक असून महापालिकेत निधी नसताना स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. ज्या काळात प्रभागामध्ये खड्ड्यामुळे नागरिक घासले होते. यावेळी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करून नगरसेविका गायत्री राणे यांनी कायमस्वरूपाचे खड्डे वाजवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, कोरोना काळामध्ये अनेक गरजूंना महा अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम राबवल्याने सर्वसामान्यांना तेच भावले आहे. या सर्व सेवाभावी उपक्रमामध्ये त्यांचे पती इंद्रजीत राणे यांचे सहकार्य लाभत आहे.
या सेवाभावी उपक्रमामध्ये भाजप मंडल अध्यक्ष अजीत राणे भावेश कोल्हे ,विक्कि विसपुते,केतन अत्तरदे, मृणाल पाटील, अमित शिंदे, वेदांत कुलकर्णी , विनय चव्हाण, हितेंद्र मराठे, शरद मराठे आणि आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते