(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्रात कोरोनाचे मृत्यू लपवले जात असल्याचे आरोप अजिबात सहन करणार नाही अश्या शब्दात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातले आरोप फेटाळले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना बाधितांची आणि मृतांची संख्या एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली होती नव्या बाधितांचा आकडा ५० ते ६० हजार तर रोज होणारऱ्या मृत्यूंची संख्या ८०० ते ९०० च्या वर गेल्याचे दिसून आले. या पार्शवभूमीवर राज्यात अजूनही मृतांचे आकडे लपवले जात असल्याचे आरोप केले जात असतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यात कोरोन मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही असेही त्यांनी सांगितले.