पुणे राजमुद्रा | भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्ती संघाला पत्र देत कारवाईचा इशारा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या कुस्तीगीर संघ काही दिवसापूर्वी बरखास्त करण्यात आला होता त्यानंतर आता महाराष्ट्र केसरी 2022 स्पर्धा नेमके कोण भरवणार हा वाद आता समोर आला आहे बाळासाहेब लांडगे यांचा पुस्तकीर संघ बरखास्त करण्यात आला आहे त्यामुळे बाळासाहेब यांनी भरवलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ नका अन्यथा भारतीय कुस्ती संघ कारवाई करणार असा इशारा देण्यात आला आहे भारतीय कुस्ती संघाने याबाबत पत्रकाळात कारवाईचा इशारा दिला आहे.
भारतीय कुस्ती संघाकडून देण्यात आले पत्र
पत्र मध्ये बाळासाहेब लांडगे ज्या कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी होते तो संघ बरखास्त करण्यात आला आहे त्या संघाकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येणार असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे मात्र या स्पर्धेत कोणत्याही पैलवानाने सहभागी होऊ नये अन्यथा त्यांच्या विरोधात भारतीय कुस्ती संघाच्या नियमाचे उल्लंघन केलं म्हणून कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा देण्यात आला आहे
याबाबत बाळासाहेब लांडगे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यावर आपले ठाम मत असल्याचे सांगितले आहे कुस्तीगीर संघावर कारवाई करण्यात आली होती. पण भारतीय कुस्ती संघाला कारवाई करण्याचा कोणत्या अधिकार नाही त्यामुळे पुढची स्पर्धा आम्हीच भरवणार आहोत, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा सचिव मीच आहे. त्यामुळे आमची कार्यकारी समितीची बैठकी झालेली आहे अशी भूमिका लांडगे यांनी घेतली आहे. याबाबत न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र कोर्टाकडून अद्याप पर्यंत निकाल आलेला नाही पण या निमित्ताने भारतीय कुस्ती संघ विरुद्ध महाराष्ट्र कुस्ती संघ हा नवीन वाद आता राज्यात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत राज्य शासन पुढे काय निर्णय देतो याकडे देखील लक्ष लागून आहे.