मुंबई राजमुद्रा | आमदार रवी राणा व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाद दिवसान दिवस वाढत असून वादावर पडदा पडण्याची शक्यता असताना आता बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याकडून झालेल्या आरोप सिद्ध करावे लागतील, तसेच त्यांनी केलेल्या आरोप अत्यंत नीच आरोप असून कोणीही मध्यस्थी केली तर ते सिद्ध झालेच पाहिजेत असं म्हणत बच्चू कडू यांनी आरपारचा इशारा दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही मुंबईत बोलून घेतल्याचे समजते आहे यावेळी दोघांना सोबत बसून समज देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
अमरावती येथे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती “माझ्या कार्यकर्त्यांची भावना अतिशय तीव्र असून तोडफोड करून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पण आला होता मी त्यांच्या भेटीला जाणार आहे. रवी राणा यांनी एकतर पुरावे द्यावे नाहीतर मग माफी मागावी मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर मी पुढील कारवाई करेल जे आहे ते आरपार होईल असा इशाराच कडू यांनी दिला आहे.
रवी राणा ने माझ्यावर अत्यंत खालच्या स्तरावर आरोप केले आहे. त्यांच्याविषयी माझ्या कार्यकर्त्याच्या मनात तीव्र भावना आहेत, मी तोडफोड करून बाहेर पडावे अशी थेट मागणी माझ्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
कडू आणि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केले आहेत. राणा, बच्चू कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिल्याचे देखील समोर आले आहे. मात्र बच्चू कडू यांनी घेतलेला आक्रमकपणा पाहता आगामी काळात राजकारणात अधिक संघर्ष होणार असल्याचे अटळ आहे.